Tiranga Times

Banner Image

‘मतदारांनी भाजपला दाखवून दिलं की, शिवसेना हा…’ मुंबईतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, वाचा…

#UddhavThackeray #BMCElection2026 #MumbaiMunicipalCorporation #ShivSena #MaharashtraPolitics #BJP #MumbaiPolitics #ElectionNews #TirangaTimesMaharastra
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 17, 2026

Tiranga Times Maharastra

 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट विजय मिळवत मुंबईची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं असताना ठाकरे बंधूंना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

बीएमसी निवडणुकीत भाजपला 89 जागा तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाला 71 जागा, काँग्रेसला 24 जागा तर इतर आणि अपक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे आता मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर विराजमान होणार आहे.

या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र या युतीचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. ठाकरे गटाला 65 जागांवर समाधान मानावं लागलं असून त्यामुळे मुंबईची सत्ता त्यांच्या हातातून निसटली आहे.

या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट भाजपवर आरोप केले. ते म्हणाले की, “मतदारांनी भाजपला दाखवून दिलं आहे की शिवसेना हा पक्ष संपलेला नाही. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे.”

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, निवडणूक निकाल स्वीकारताना आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काही जागांवर अपयश आलं असलं तरी शिवसेना टिकून आहे आणि पुढील काळात अधिक ताकदीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

Breaking News:

Recent News: